ॲड. प्रकाश आंबेडकर : आरएसएस संविधान विरोधी आहे
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून स्वीकारतो का आणि त्यांना भारताचा राष्ट्रध्वज मान्य आहे का, ते भारतीय संविधानाशी एकनिष्ठ आहेत का? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि RSS यांच्यावर निशाणा साधत विचारले आहेत.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळाले असेल. उत्तर नाही आहे. RSS धर्मनिरपेक्ष भारतविरोधी आहे,RSS तिरंगाविरोधी आहे, RSS संविधानविरोधी आहे.
एखादा सरकारी कर्मचारी RSS आणि त्यांच्या विभाजनवादी विचारसरणीशी एकनिष्ठ असेल तर तो भारताशी एकनिष्ठ कसा असू शकतो ? असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.