Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 24, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण यात्रा

मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलढाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यातून आरक्षण बचाव यात्रा जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होऊन या यात्रेची सांगता होणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, एकीकडे ओबीसी समाज प्रचंड घाबरलेला आहे. विशेषतः छोटा ओबीसी घटक घाबरलेला आहे. 12 दिवसांत लहान ओबीसी नेत्यांवर हल्ला झाला आहे. नाभिक समाजाची दुकाने जाळली आहेत. जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की, लहान ओबीसींच्या दुकानावर जायचे नाही, काही विकत घ्यायचे नाही असेही आदेश निघाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे.

मध्यंतरी शरद पवार यांचे स्टेटमेंट होते की, आम्ही विधानसभेला 225 आमदार निवडून आणणार आहोत. यामुळे राज्यातील परिस्थिती अजून भयाण झालेली असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना, संघटनांना पक्षाच्या वतीने आम्ही निमंत्रणाचे पत्र लिहिले आहे ते यामध्ये सामील होत आहेत. शरद पवार हे विरोधी पक्षात आहेत त्यांनाही या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. शांतता प्रस्थापित करणे आणि जनजागृती करणे हा आरक्षण बचाव यात्रेचा हेतू असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.


       
Tags: ArkshanBachaoYatraMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा

Next Post

ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

Next Post
ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!
बातमी

हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

by mosami kewat
August 20, 2026
0

मुंबई : आरएसएस-भाजपने हल्द्वानी मध्ये केलेले 'शुद्धीकरण' हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात केलेले जातीयवादी आणि अस्पृश्यतेचे एक घृणास्पद...

Read moreDetails
नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

August 20, 2026
जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

August 20, 2026
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी-दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home