मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे महाविकास आघाडीच्या बैठकीत पोहचले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर हजर राहत असल्याने संपूर्ण राज्याचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.






