संतांचे आस्तित्व आजही आपल्याला मान्य करावे लागते.
बीड: संताचे अस्तित्व आजही आपल्याला मान्य करावे लागते. ते यासाठी मान्य करावे लागेल की, त्यांनी आपल्यावर एक जबाबदार दिली.ती जबाबदारी म्हणजे माणसा-माणसांमधली जी जातिव्यवस्था आहे, ती मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातूनच आपल्याला शिवाजी महाराजांचे, मावळ्यांचे राज्य उभं राहिलेले दिसले असे विचार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, बीड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
आताच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला नव्याने देश उभा करायचा असेल, तर संविधान ही आपल्याला सांगते की, जाती-जातीमधील अंतर कमी झाले पाहिजे, माणसं माणसे म्हणून जगली पाहिजेत. ही जी संताची वाणी होती, ती वाणी आपल्याला संविधानामध्ये ही दिसत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी, यावेळी विठ्ठल महाराज, मंत्री धनंजय मुंडे, वंचितचे नेते प्रा.किसन चव्हाण, डॉ. अरुण जाधव उपस्थित होते.