नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अंतर्गत जिल्हा कमिटीची विभागीय दौरा उत्साहात पार पडली. या विभागीय दौऱ्यास जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विभागीय दौरा उत्साहात संपन्न झाली.
या विभागीय दौऱ्यात राज्य कमिटीच्या नेतृत्वाखाली 21 सप्टेंबर 2025 रोजी ऐरोली येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यावर सविस्तर चर्चा झाली तसेच विभाग कमिटी संदर्भात प्रत्येक विभागाशी चर्चा करण्यात आले.
या विभागीय दौऱ्याचे सुरुवात दिघा विभागापासून करण्यात आले. त्यानंतर रबाळे विभाग, श्रमिकनगर, सिवूड विभाग, तुर्भे विभाग,आणि घणसोली विभाग या सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा कमिटीचे जोरदार स्वागत आणि सत्कार करण्यात आले.
यावेळी दिघा विभागातून राजेश भालेराव,रबाळे विभागातून सतीश भोसले, श्रमिकनगरातून गौतम सपकाळे, सिवूड विभागातून उमेश हातेकर, तुर्भे विभागातून जेष्ठ नेते राजेंद्र बनसोडे, घणसोली विभागातून गजानंद जाधव, उत्तम रोकडे आणि सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने विभागीय दौरा यशस्वीरित्या पार पडले. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महिला जिल्हा अध्यक्षा शिल्पा रणदिवे यांनी मानले सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार.
या दौऱ्यावेळी अश्वजीत जगताप (जिल्हाध्यक्ष), शिल्पा रणदिवे (महिला जिल्हाध्यक्षा), अजय शिंदे, गौतम कांबळे, दीपक बाणाईत, सुरेखा वानखेडे, कविता हिवाळे, संदेश हत्तर्गे,पल्लवी शिंदे, रामदास कांबळे,कपिल कांबळे, अनिल पालमपल्ले, संदीप वाघमारे, मल्लिनाथ सोनकांबळे, आकाश भारदे, मुकेश इंगळे इत्यादी जिल्हा कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एसआरएच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात धडक मोर्चा
पुणे : महायुती सरकार व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जीण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुणे शहर...
Read moreDetails





