अकोला : वंचित बहुजन आघाडीची अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू सर्कलची बैठक नुकतीच प्रचंड उत्साहात पार पडली. मुसळधार पाऊस असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक मंजुषा बाबा दर्गा येथे आयोजित करण्यात आली होती आणि तिची अध्यक्षता वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य व अकोला जिल्हा समन्वयक ऍड. खतीब साहेब यांनी केली.
या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा होता. या संदर्भात कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले.
बैठकीत अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, माजी जि. प. सदस्य नीता गवई, माजी पं. स. सदस्य छाया वानखडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगला सिरसाठ, हाजी चिनी साहेब, राजू मिया देशमुख, विजय बागडे, ज्ञानेश्वर वानखडे, अशोक तायडे, दीपक वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे वानखडे साहेब, सना, वसीम, आणि अन्सार यांचा समावेश होता.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न
वाशिम : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय...
Read moreDetails