Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन

mosami kewat by mosami kewat
February 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन
       
कर्जत : कर्जत शहराचे नामकरण ‘श्री संत गोदड महाराज नगरी’ करावे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्जत नगरपंचायतीसमोर सोमवारी (२ फेब्रुवारी) जोरदार ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन करण्यात आले. वंचितचे प्रदेश प्रवक्ते जामखेडचे नगरसेवक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. (Karjat news)

आंदोलनातील प्रमुख मागण्या-

– कर्जत शहराचे अधिकृत नाव ‘श्री संत गोदड महाराज नगरी’ करणे.

– प्रभाग क्रमांक ९ ला ‘दलित वस्ती’ घोषित करून तेथे नागरी सुविधा पुरवणे.

– शहा गार्डन शेजारील अपूर्ण अवस्थेत असलेल्या अभ्यासिका केंद्राचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे.

– नवीन उपनगरांमधील खुल्या जागांमध्ये (Open Space) बौद्ध विहार, मंदिर आणि मशीद यांसाठी जागा राखीव ठेवणे.

– सिद्धार्थनगरसह सरकारी कार्यालयांमधील शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी कायमस्वरूपी कामगारांची नियुक्ती करणे.

निवेदन देऊन दहा दिवस उलटले तरी मुख्याधिकारी अक्षय जायभाय आंदोलनावेळी गैरहजर राहिल्याने अ‍ॅड. अरुण जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जबाबदार अधिकार्‍यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी मानवी हक्क आयोग आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार करणार, असा इशारा जाधव यांनी भाषणातून दिला. ( Karjat news)

या आंदोलनाला रासपाचे तालुकाध्यक्ष सोनू भिसे, शिवसेना (उबाठा) गटाचे अमोल क्षीरसागर, आणि रिपाइं गटाचे युवा नेते  विशाल काकडे यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. तसेच जिल्हा सल्लागार चांगदेव सरोदे, तुकाराम पवार, अनिल समुद्र, आणि शब्बीर पठाण यांचीही भाषणे झाली. (Karjat news)

नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक प्रियांका म्हेत्रे यांनी आंदोलकांशी चर्चा करून सर्व मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी दत्ता भालेराव, लखन पारसे, विकास समुद्र, देवा खरात, सचिन धावडे, सोमनाथ गोरे, शितल काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

Tags: Arun JadhavJusticekarjatKarjat newsMaharashtraPoliticalpolticsPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

भाजप विरोधात लढणारा ‘वंचित’ हाच एकमेव सक्षम पर्याय – सुजात आंबेडकर

Next Post

प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home