Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

mosami kewat by mosami kewat
February 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड
       

मुंबई: प्रभादेवी परिसरात एका १९ वर्षीय तरुणाची जातीय द्वेषातून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंशू कुमार असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दादर पोलिसांनी २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्याचा रहिवासी असलेला अंशू कुमार गेल्या दोन वर्षांपासून प्रभादेवी येथील एका चहाच्या टपरीवर काम करत होता. त्याच्यासोबत त्याच्याच गावातील वीरेंद्र पाल आणि इतर काही तरुण राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अंशू हा आंबेडकरवादी विचारसरणीचा होता. तो वारंवार मनुवादी विचारांवर प्रश्न उपस्थित करत असे, ज्याचा राग उच्चवर्णीय समाजातील वीरेंद्र पाल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात होता. या वैचारिक मतभेदातून सहा महिन्यांपूर्वीही अंशूला मारहाण करण्यात आली होती.

दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी याच जातीय मानसिकतेतून अंशूला दारू पाजून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अंशूच्या मृतदेहावर डोळ्यांवर, डोक्यावर आणि गळ्यावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादर पोलीस ठाण्यात धडकले. २ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राकेश बुवा कांबळे, मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश अशोक दोडके, माजी उपाध्यक्ष अशोक गुजेट्टी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अंशूचे वडील सोनेलाल यांच्यासह पोलिसांची भेट घेतली.

हा खून केवळ वादातून झालेला नसून तो जातीयवादी मानसिकतेचा आणि मनुवादी व्यवस्थेचा बळी आहे. या प्रकरणात अजून काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे, असा आरोप अंशूच्या वडिलांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे संबंधित टी स्टॉल मालकाने अंशूचा मृतदेह आणि त्याच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विमानाचा सर्व खर्च उचलला आहे. सोमवारी अंशूचे वडील आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन फतेहपूरकडे रवाना झाले.

पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, “अंशू कुमारला न्याय मिळेपर्यंत ही लढाई आम्ही कोर्टात लढणार,” असा निर्धार आकाश अशोक दोडके यांनी व्यक्त केला आहे. 

prabhadevi-caste-hate-murder-19-year-old-anshu-kumar-accused-arrested


       
Tags: crimeMaharashtramumbaiMumbai newsmurderPoliticalPrabhadeviprabhadevi caste hate murderVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन

Next Post

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

Next Post
११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home