Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

mosami kewat by mosami kewat
February 3, 2026
in article, अर्थ विषयक
0
११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?
       

संजीव चांदोरकर 

या वर्षी काढलेले कर्ज १७ लाख कोटी रुपये असेल आणि पूर्वी काढलेल्या कर्जाची परतफेड (५ लाख कोटा रुपये) आणि त्यावरील व्याज (१४ लाख कोटी रुपये) यासाठी एकूण १९ लाख कोटी रुपये! 

विचार तर कराल ! केंद्र सरकारकडे पैसे उभारण्याचे दोन प्रमुख वित्तीय स्रोत असतात एक, कर संकलन आणि दोन, कर्ज उभारणी 

कर दोन प्रकारचे असतात ; प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कर वाढवण्यास नेहमीच मर्यादा असतात. पण प्रत्यक्ष करांचे तसे नाही. मध्यमवर्गाचे आयकर , आयातकर नका वाढवू. पण इतर अनेक स्रोत आहेत की. 

देशातील जमीन व्यवहार, भांडवल बाजार यातील सट्टेबाजी, वारसा कर, वेल्थ टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन अशा अनेक बाबी आहेत ज्यावर प्रत्यक्ष कर लावता येऊ शकतात. 

पण मोदी राजवट ११ वर्षे झाली , एवढे बहुमत हाताशी आहे , तरी या आघाडीवर काहीही करत नाही. का? 

जीडीपीच्या तुलनेत एकूण कर संकलन (एकूण टॅक्स / जीडीपी रेशो) गेली अनेक वर्षे वाढत नाहीये. गेली दहा वर्षे तो ११ टक्क्यांच्या अवतीभवती घोटाळत आहे. 

गप्पा विकसित देश होण्याच्या मारायच्या. पण विकसित देशांचा टॅक्स/ जिडीपी रेशो फॉलो करायचा नाही. OECD या श्रीमंत देशांचा सरासरी टॅक्स / जीडीपी रेशो ३४ टक्के आहे. आपला ११ टक्के !

त्यामुळे सारा भर कर्ज उभारणीवर आहे. केंद्र सरकारने बाजारात उभारलेले कर्ज (आकडे लाख कोटी रुपये) 

२०२३-२४: १५.४३; २०२४-२५: १४.०; २०२५-२६: १४.८२; २०२६-२७: १७ लाख कोटी 

याला Gross Borrowings म्हणतात; यातील काही भाग आधीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी जातात ; यावर्षी अंदाजे ५ लाख कोटी परतफेडीसाठी जातील 

दरवर्षी कर्ज उभारणी केली की दरवर्षी त्यावरचे व्याजाचे आकडे exponentially वाढतात. कारण प्रत्येक नवीन कर्जामुळे संचित कर्जाचे आकडे वाढतात. नजीकच्या काळात यात बदल होणारा नाही. 

दरवर्षी व्याजावर किती खर्च होतात ते पहाः (लाख कोटी रुपये) २०२३-२४: १०.६४ ; २०२४-२५: ११.३८ ; २०२५-२६: १२.७६ ; २०२६-२७: १४.००

कर्ज काढल्यामुळे दरवेळी देश गाळात जातोच असे काही नसते. कर्ज कशासाठी वापरले जाते हा मुद्दा महत्वाचा असतो. 

वरच्या आकडेवारी वरून हे दिसेल कि नव्याने उभारलेले कर्ज आधीच्या कर्जाची परतफेड आणि व्याजावर खर्च होणार आहे. 

कर्ज टू वे ट्रॅफिक आहे. रक्कम तिजोरीत येते पण त्याची परतफेड / व्याजासाठी रक्कम तिजोरीतून जाते देखील. त्यामुळे कर्ज हे संक्रमणकाळातील ऍरेंजमेंट आहे. हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. ते परमनंट सोल्युशन कधीही असणार नाही. 

उलटपक्षी कर संकलन हा वन वे स्रोत आहे. त्याचे भविष्यात , पुढच्या पिढयांना काही उत्तरदायित्व नसते. शासनाचा सर्वात महत्वाचा विशेषाधिकार असतो कर बसवण्याचा आणि वसुलीचा. जो महाकाय कॉर्पोरेट कडे देखील नसतो. तो वापरला जात नसेल तर काहीतरी गडबड आहे. 

हा केंद्र सरकारचा, मोदी यांचा किंवा सीतारामन यांचा व्यक्तिगत प्रश्न नाहीये. हा आपला, आपल्या पुढच्या पिढ्यांचा प्रश्न आहे. 


       
Tags: EconomicsElectionIndia budget २०२६MaharashtramumbaiPoliticalpoltics
Previous Post

प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

Next Post

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

Next Post
भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home