लोणावळा : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये एका विटंबना केली. या प्रकाराने समाजात संतापाची लाट उसळली आहे. सदर घटनेतील आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी मावळ वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या संदर्भात नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघारे यांना निवेदन दिले. या निवेदनात विटंबना करणाऱ्या आरोपीवर कोणती कलमे दाखल केली आहेत याची माहिती, तसेच या प्रकरणी पोलिसांनी कशाप्रकारे तपास केला याचे संपूर्ण तपशील चार ते पाच दिवसांत जनतेसमोर सादर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली नाही तर लोणावळा पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
सदर निवेदन देताना मावळ तालुका अध्यक्ष नितीन मारुती ओव्हाळ, ज्येष्ठ नेते प्रकाश गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, युवा अध्यक्ष संदीप कदम, महिला अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, भरत गुप्ते, करण भालेराव, सुनील वाघमारे, सचिव लहूभाऊ लोखंडे, हर्षदा गजरमल, अर्जुन मोरे, शिवराम कांबळे, अक्षय साळवे, बब्रुवन कांबळे, प्रविण भवार, वसीम खान, मिलिंद गुप्ते, सुमित साळवे, संतोष सोनवणे आदींसह जिल्हा, तालुका व शहरातील पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या घटनेमुळे समाजभावना दुखावल्या असून, आरोपीवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी आंदोलनस्थळी करण्यात आली.