Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पारधी महिलेला जातीवाचक शिवीगाळ; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
February 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पारधी महिलेला जातीवाचक शिवीगाळ; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
       
जालना: जालना तालुक्यातील पुणेगाव येथील पारधी आदिवासी समाजातील महिला सोनाली चव्हाण यांना झालेल्या मारहाण प्रकरणी न्याय मागण्यासाठी गेलेल्या पीडितेला पोलीस प्रशासनाकडून अपमानस्पद वागणूक मिळाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि फाशी पारधी आदिवासी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणेगाव येथील सोनाली चव्हाण यांना काही व्यक्तींनी मारहाण केली होती. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी त्या तालुका पोलीस स्टेशनला गेल्या असता, पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी ‘पारधी जमातच गुन्हेगार आहे, तुमचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही’ असे म्हणून जातीवाचक शब्द वापरले आणि त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून देण्यात आले. (Jalna news)

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मारहाण करणाऱ्या आरोपींसह, कर्तव्यात कसूर करून जातीवाचक बोलणाऱ्या पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यावर तात्काळ कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके म्हणाले की, “रक्षणकर्त्या पोलिसांनीच जर अशा प्रकारे जातीवाचक भेदभाव केला, तर सामान्य जनतेने कोणाकडे जायचे? जर येत्या दोन दिवसांत संबंधित पोलीस निरीक्षक आणि आरोपींवर कारवाई झाली नाही, तर पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र मोर्चा काढला जाईल.” (Jalna news)

या आंदोलनात फाशी पारधी आदिवासी संघटनेचे अध्यक्ष दिपू पवार, वंचितचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, विलास भिंगारे, सत्यपाल गायकवाड, गौतम काकडे, पीडित सोनाली चव्हाण, निला काकडे, संजय आदमाने, चंद्रा पवार, राधा भोसले, आरकेस्ट्रा चव्हाण, पुजा चव्हाण, प्रशांत सोनवणे, गोपाल पवार यांच्यासह शेकडो महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: CateConstitutionJalna newsJusticeMaharashtrapolicePoliticPoliticalprotestVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मणिपूर: उखरूलमध्ये सशस्त्र गटांकडून घरांची जाळपोळ; तणावानंतर संचारबंदी लागू

Next Post

नांदुरा तालुक्यातील फुली येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखा फलकाचे थाटात उद्घाटन

Next Post
नांदुरा तालुक्यातील फुली येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखा फलकाचे थाटात उद्घाटन

नांदुरा तालुक्यातील फुली येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखा फलकाचे थाटात उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home