Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रील शूट करताना मोठी दुर्घटना; ओडिशातील तरुण यूट्यूबर धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला‎

mosami kewat by mosami kewat
August 25, 2025
in बातमी
0
रील शूट करताना मोठी दुर्घटना; ओडिशातील तरुण यूट्यूबर धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला‎
       
‎‎ओडिशा : सध्या सोशल मीडियाच्या युगात ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी लोक काय करतील, याचा अंदाज लावता येत नाही. याचेच एक धक्कादायक उदाहरण नुकतेच ओडिशामध्ये समोर आले आहे. येथील एक २२ वर्षीय यूट्यूबर सागर टुडू हा मित्रांसोबत रील बनवण्यासाठी कोरापुट जिल्ह्यातील डुडुमा धबधब्याजवळ गेला होता. मात्र, रील शूट करत असताना पाण्याचा जोरदार प्रवाह वाढल्याने तो त्यात वाहून गेला.‎‎

शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक पर्यटन स्थळांचे व्हिडिओ आणि रील बनवणारा सागर आपल्या मित्रासोबत धबधब्याजवळ ड्रोनने शूटिंग करत होता. त्याचवेळी मुसळधार पावसामुळे माचकुंड धरणातून अचानक पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे पाण्याच्या पातळीतही वाढ झाली.‎‎

हा धोका लक्षात न घेता सागर पाण्यात उभा राहून रील बनवत राहिला. पाहता पाहता तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकला. त्याचे मित्र आणि आजूबाजूला असलेले पर्यटक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की, क्षणात तो त्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेला. हा थरारक आणि दुर्दैवी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.‎‎

माचकुंडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, अद्याप सागरचा शोध लागलेला नाही. या घटनेमुळे सोशल मीडियावर ‘कंटेंट’साठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. नेटकरी ‘रील कल्चर’वर संताप व्यक्त करत असून, “हे मूर्खपणाचे कृत्य आहे” आणि “नैसर्गिक आपत्तींमध्ये अशा ठिकाणी जाणे धोकादायक आहे,” अशा प्रतिक्रिया देत आहेत.

Tags: InternetLikeMobileMonsoonNetworkOdisharainsocial mediaYouTube
Previous Post

हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीचा एनएचएम आंदोलनाला पाठिंबा!

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर ॲट्रॉसिटी दाखल करा; वंचित बहुजन आघाडी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home