
शिरूर कासार (जि. बीड) – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने (VBA) विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी केले. या मोर्च्यात जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर, सचिन मेघडंबर, भारत तांगडे, पुरुषोत्तम (गोटू) वीर, भीमराव औसरमल, राजेंद्र पोकळे, जिल्हा महासचिव खंडू देवराव जाधव, सहसचिव ॲड. संदीप रोकडे, जिल्हा संघटक डॉ. गणेश खेमाडे, जिल्हा सहसंघटक अर्जुन जवंजाळ, जिल्हा सल्लागार सुदेश पोतदार आणि प्रसिद्धी प्रमुख राजेश कुमार जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. मोर्चाचे आयोजन शिरूर तालुकाध्यक्ष दिलीप महादेव माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
या आंदोलनात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाजवळ पोहोचल्यावर पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच धरणे धरले व ठामपणे भाषणे केली. यानंतर तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि सात दिवसांत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. मोर्चात पाटोदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, युवा नेते डॉ. जतीन वंजारे, तालुका महासचिव सचिन यंकुळे, चंद्रकांत व मनोहर अवसरमल गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.