Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
मुंबई : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी बार्टी, सारथी, आर्टी आणि महाज्योतीच्या धर्तीवर राज्यस्तरीय शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सल्लागार समिती सदस्य महेश भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या पत्रात म्हटले आहे की, “राज्यातील ३६ लाख मुस्लिम विद्यार्थ्यांना मॅट्रिक, पोस्ट-मॅट्रिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी. अल्पसंख्यांक विभागामार्फत यासाठी स्वतंत्र बजेट तरतूद व्हावी.”

यामध्ये खालील ठळक मागण्या करण्यात आल्या आहेत –

  1. MPSC, UPSC, IBPS, NEET, JEE, MS-SET, IELTS, LNAT सारख्या परीक्षांचे शुल्क शासनाने भरावे व प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे.
  2. परदेशी शिक्षणासाठी किमान ७५ जागा राखीव ठेवाव्यात.
  3. मालेगाव, औरंगाबाद, अकोला, नागपूर, भुसावळ व सांगली येथे मुलं-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावीत.
  4. तलाक पीडित महिलांना कौशल्य विकास व नर्सिंगचे प्रशिक्षण देऊन ४ टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावे.
  5. स्वतंत्र मुस्लिम विभाग स्थापन करून पायलट, मिलिटरी व पोलिस भरतीसाठी विशेष बजेट ठेवावे.
  6. मुस्लिम समाजावरील खोटे खटले मागे घेण्यासाठी कायदेशीर सेवा सुरू करावी.

सच्चर आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज व्यक्त केली आहे. “मुस्लिम समाजातील फक्त २ टक्के विद्यार्थीच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. ही स्थिती बदलण्यासाठी शासनाने त्वरीत ठोस पावले उचलावीत,” असाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

Tags: #CMOMaharashtraDevendra Fadanvisforeign educationmumbaiMusalmanMuslimPrakash AmbedkarpunescholershipVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शिरूर कासार येथे वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा!

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानंतर गोसावी समाजाच्या मागण्यांवर प्रशासनाची तात्काळ दखल; २२ ऑगस्टला विशेष शिबिराचे आयोजन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा
बातमी

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

by mosami kewat
August 31, 2026
0

नांदेड : ५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक २६ नुसार विविध शासकीय विभागांमधील लघुलेखक (Stenographer)...

Read moreDetails
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home