Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही – प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

mosami kewat by mosami kewat
August 13, 2025
in बातमी
0
सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही - प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही - प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर दिल्लीतील भेटीगाठींच्या मुद्द्यावरून थेट हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६० जागा जिंकून देण्याची ग्वाही देणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींमुळे आपली राहुल गांधींशी भेट झाली, असा दावा शरद पवार यांनी केला होता.
‎
‎यावर, “खोटं बोलण्यालाही एक मर्यादा असते, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर सडकून टीका केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत x ( ट्विटर) म्हटले आहे की, शरद पवार यांना राहुल गांधींसोबत त्यांची भेट घडवून आणणाऱ्या त्या दोन लोकांची नावे आठवत नाहीत, हे हास्यास्पद आहे. राहुल विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते.
‎
‎त्यामुळे ज्या दिवशी शरद पवार राहुल गांधींना भेटले, त्या दिवसाची रजिस्टर नोंद तपासल्यास त्यांच्यासोबत कोण होतं, हे सहज स्पष्ट होऊ शकतं, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, तुम्ही सामान्य माणसाला फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही.
‎
‎ या टीकेमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आधीच सुरू असलेल्या धुसफुशीत आणखी भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून अनेक नेत्यांमध्ये मतभेद समोर येत आहेत.

Tags: Prakash AmbedkarRahul GandhiSharad Pawar
Previous Post

तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव

Next Post

पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये ‘रक्षाबंधन’ साजरा

Next Post
पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये 'रक्षाबंधन' साजरा

पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये 'रक्षाबंधन' साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार
Uncategorized

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

by mosami kewat
August 25, 2026
0

पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची वंचित बहुजन आघाडीने दखल घेतली आहे....

Read moreDetails
मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

August 25, 2026
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

August 24, 2026
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home