Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

mosami kewat by mosami kewat
June 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 
       
मनमाड : मनमाड नगरपरिषद हद्दीतील ‘आय.यु.डी.पी.’ (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी ‘सार्वजनिक गार्डन’ म्हणून राखून ठेवण्याऐवजी, ती जागा वैयक्तिक भाडेकराराने देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

मनमाड नगरपरिषदेने १० एप्रिल २०२६ रोजी घेतलेल्या सभा ठराव क्र. १० नुसार, ही मोक्याची जागा खाजगी वापरासाठी भाडेकराराने देण्याचा घाट घातला आहे. या जागेवर आता खाजगी ‘टर्फ’चे कामही सुरू झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने याआधी १३ मे २०२६ रोजी निवेदनाद्वारे ही जागा सार्वजनिक वापरासाठीच ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर आज आंदोलन पुकारण्यात आले होते.

यावेळी शहराध्यक्ष विलास अहिरे व वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही हे आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. जर प्रशासनाने हा बेकायदेशीर ठराव त्वरित रद्द केला नाही, तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”

या धरणे आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे आणि जिल्हा सचिव कादिर शेख यांनी केले. तसेच जिल्हा नेते दिपक साळवे (साळवे बाबा), संदीप पवार, निलेश निकम, सागर गाढे, राकेश पगारे, अमोल केदारे, अशफाक शहा, काकासाहेब भालेराव, खुशाल थोरात, सुनील बागुल.किरण पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Garden landMaharashtraManmadPoliticalमनमाड
Previous Post

स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

Next Post

पानगावात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव; विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा ग्रामपंचायतीसमोर हालगी बजाव आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home