Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

mosami kewat by mosami kewat
June 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन
       
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांना दोनवेळा एटीकेटी (ATKT) लागल्यास अपात्र ठरविण्याची अट रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आज समाज कल्याण विभागाकडे निवेदन देण्यात आले.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींनी समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त प्रमोद जाधव यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी मांडल्या. निवेदनात त्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान एटीकेटी लागल्यामुळे योजनेतून वगळणे अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे दोनवेळा एटीकेटी असल्यास विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारी जाचक अट तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सह आयुक्त प्रमोद जाधव यांनी निवेदनाची दखल घेत सदर मागणी शासनाकडे पाठवून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहरचे महासचिव अभिषेक चरण कांबळे, माजी अध्यक्ष चैतन्य प्रभाकर इंगळे, संघटक प्रशिक संजय भारदे, ओम संजय तांबे आणि प्रणव प्रकाश कांबळे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि स्वाधार योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने ही मागणी लावून धरली असून, शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Tags: EducationMaharashtrapuneSamyak Student MovementstudentSwaadhar SchemeVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

औरंगाबादमध्ये “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

Next Post
मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home