Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

Akash Shelar by Akash Shelar
August 4, 2025
in बातमी
0
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

‎औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात कार्यकर्त्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानल्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याबद्दल हे बॅनर लावण्यात आले आहेत.
‎
‎बॅनरवर, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे, असे नमूद करत त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, हा लढा अजून संपलेला नाही, जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील! असा संदेशही या बॅनरवर लिहिलेला आहे.
‎
‎ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. या बॅनरबाजीमुळे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा शहरात सुरू झाली आहे.
‎
‎काय आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण?
‎
‎परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‎
‎सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर एका आठवड्यात मृत्यूचे संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
‎
‎30 जुलै रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशान्वये परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि सोमनाथचे कुटुंब काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
‎
‎सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे (CID) वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने अगोदर या खुनाच्या प्रकरणात कोण पोलीस दोषी आहेत त्याची जबाबदारी निश्चित करून मग नावे या गुन्ह्यात समाविष्ट करावीत असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
‎
‎

Tags: Prakash AmbedkarSomnath Suryavanshi murder casevbaforindiaऔरंगाबाद
Previous Post

पोलिसी दडपशाहीला ठणकावून सांगा, कायदा कायदा असतो…!

Next Post

कोथरूड पोलिस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध

Next Post
कोथरूड पोलिस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध

कोथरूड पोलिस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home