Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोथरूड पोलिस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध

Akash Shelar by Akash Shelar
August 4, 2025
in बातमी
0
कोथरूड पोलिस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध

कोथरूड पोलिस ठाण्यातील महिलांवरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध

पुणे : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा तसेच संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे.
‎
‎या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहर आणि जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
‎
‎नेमकं प्रकरण काय?
‎
‎1 ऑगस्ट रोजी एका विवाहित महिलेसोबत कोथरूड पोलीस ठाण्यात अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करत अपमानजनक वागणूक दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अशीच अपमानास्पद वागणूक दिली, या प्रकरणाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
‎
‎या घटनेची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
‎
‎ १) पीडित महिलेची तक्रार तात्काळ नोंदवून घ्यावी.
‎
‎ २) कोथरूड आणि औरंगाबाद येथील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
‎
‎ ३) संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
‎
‎३) या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करावे.

‎
‎या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा सल्लागार जी. डी. शिरसाट, योगेश गुंजाळ, राजीव भिंगारदीवे, गणेश राऊत, संदीप वाघमारे, रोहिदास डोकडे, संकेत शिंदे, रियाज शेख, गोविंद आठवले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: policeProtestspunevbaforindiaकोथरूड पोलिस
Previous Post

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; सोलापूर येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home