Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांवर ‘जंगली रमीचा आरोप: विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड

mosami kewat by mosami kewat
July 20, 2025
in बातमी
0
'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

‎मुंबई : महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.
‎
‎शेतकरी अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त असताना, कृषिमंत्र्यांच्या या कथित कृतीमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याबाबत सरकारची उदासीनता याच कारणामुळे असावी, अशी टीका केली आहे.
‎
‎राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कर्जमाफीची प्रतीक्षा आणि नापिकीमुळे ग्रामीण भागातील गंभीर परिस्थिती असताना, सभागृहात मंत्र्यांच्या अशा वर्तनामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे ‘जंगली रमी’ नावाचा ऑनलाइन गेम खेळताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
‎
‎आमदार कैलास पाटील यांनी या घटनेनंतर सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे राज्यातील तरुण आणि शेतकरी कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरीही सरकारने यावर कारवाई का केली नाही, हे आता स्पष्ट होत आहे, असे पाटील म्हणाले. मंत्रिमंडळातीलच काही सदस्य या गेमचे व्यसनी बनले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
‎
‎पाटील यांनी यापूर्वी सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची मागणी केली होती. “लाखो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना मुख्यमंत्री यांनी या गेमवर बंदी का आणली नाही, हे आता मला कळाले आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना याचे व्यसन लागले असल्याचे दिसून येत आहे,” असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
‎

Tags: AgriculturegovernmentJangli RummyMaharashtra
Previous Post

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत निषेध बैठक

Next Post

अॅड प्रकाश आंबेडकरांच्या कर्तृत्वाला संशोधनाची झालर….!!

Next Post
अॅड प्रकाश आंबेडकरांच्या कर्तृत्वाला संशोधनाची झालर….!!

अॅड प्रकाश आंबेडकरांच्या कर्तृत्वाला संशोधनाची झालर….!!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद
बातमी

पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

by mosami kewat
March 13, 2026
0

पुणे : गॅस सिलिंडर टंचाईमुळे खानावळींसह ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांवर परिणाम देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर जाणवू...

Read moreDetails
परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

March 13, 2026
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

March 12, 2026
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home