कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अशोक स्तंभ आणि राजमुद्रेऐवजी ‘सेंगोल’च्या जाहिरातीचे व फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
गेले आठवडाभर सुरू असलेल्या या प्रदर्शनामुळे भारतीय संविधानाचा अपमान होत असल्याचा आरोप करत, हे प्रदर्शन तात्काळ हटवण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली. वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी कार्यकर्त्यांनी हे ‘सेंगोल’ अधिकृत आहे का, तसेच हे प्रदर्शन दिशाभूल करणारे डिझाइन आहे, असा जाब विचारला. हे फलक काढण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला.
यावेळी पोलीस प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख अधिकारी अडसूळ यांच्यासोबतही चर्चा करण्यात आले. मात्र, वंचित बहुजन युवा आघाडीची भूमिका स्पष्ट होती. संविधानाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही आणि हे फलक तात्काळ हटवण्यात यावेत. ‘भारतीय संविधान जिंदाबाद’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’ अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस बंदोबस्ताखालील प्रमुख अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, संबंधित डिझाइन आणि बॅनर हटवण्याचे आदेश देण्यात आले. अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते फलक काढून टाकले आणि पुढील निर्णय कळवण्याचे आश्वासन दिले.
या घटनेनंतर वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, पुन्हा असे काही निदर्शनास आल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ते उधळून लावले जाईल. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, कोल्हापूर शहराध्यक्ष अमित नागटिळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, महासचिव डॉ. आकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, करवीर उपाध्यक्ष सचिन कांबळे, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, महाबोधी पद्माकर संतोष पवार, कागल तालुकाध्यक्ष आशिष कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी रवाना
अकोला : बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे येत्या 5...
Read moreDetails