जालना : भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी अखेर पीडित महिला शीला संदीप भालेराव यांची भेट घेतली आहे.
डॉ. पाटील यांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात जाऊन शीला भालेराव यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. कासोद, डॉ. दीपक सोन्नी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ, नितीन जोगदंडे, उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही
मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे....
Read moreDetails






