Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Prakash Ambedkar यांचा अमित शाहंवर निशाणा: ‘भारतीय न्याय संहितेत कोठडीतील मृत्यूबाबत तरतूद नाही’

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 2, 2025
in बातमी, मुख्य पान, विशेष
0
प्रकाश आंबेडकरांचा अमित शाहंवर निशाणा: 'भारतीय न्याय संहितेत कोठडीतील मृत्यूबाबत तरतूद नाही'

प्रकाश आंबेडकरांचा अमित शाहंवर निशाणा: 'भारतीय न्याय संहितेत कोठडीतील मृत्यूबाबत तरतूद नाही'

       

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेवर (BNS) जोरदार टीका केली आहे.

‎ ‎भारतीय दंड संहितेची (IPC) नक्कल करून केवळ कायद्याचे नाव बदलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. परभणी येथे कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी लढत असल्याचे सांगत, आंबेडकरांनी कोठडीतील मृत्यूसाठी शिक्षेची कोणतीही तरतूद भारतीय न्याय संहितेत नसल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे.

‎ ‎प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “काय बदललं आहे तुम्ही,अमित शाह तुम्ही भारतीय दंड संहितेची (IPC) नक्कल केली आणि त्याऐवजी भारतीय न्याय संहिता (BNS) लागू केली. जर तुम्ही खरोखरच न्याय सुलभ केला असेल, तर हिरासततील मृत्यूसाठी शिक्षेची कोणतीही तरतूद किंवा कायदा का नाही?!” ‎ ‎आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी लढत असल्याचे नमूद केले, “मी सोमनाथ सूर्यवंशी – वडार समाजातील एक भीम सैनिक – यांच्यासाठी न्यायाची लढाई लढत आहे,

ज्यांचा परभणी येथे कोठडीत छळ आणि मारहाणीमुळे मृत्यू झाला.” ‎ ‎त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, न्यायालयात त्यांनी अशा कायद्याची मागणी केली आहे, ज्याचा उद्देश कोठडीतील मृत्यू आणि छळ थांबवणे, जबाबदार व्यक्तींना जबाबदार धरणे आणि पीडितांना भरपाई प्रदान करणे हा आहे. ‎ ‎ट्विटच्या शेवटी, प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे, “अमित शाह, तुम्ही लोकांनी काहीही बदललेले नाही!” या टीकेमुळे भारतीय न्याय संहिता आणि त्यातील तरतुदींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तसेच कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांवर गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.


       
Tags: प्रकाश आंबेडकर
Previous Post

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून ‘कृषी दिन’ साजरा ‎

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेंगोल’ प्रदर्शनावरून वंचित बहुजन युवा आघाडीचा तीव्र विरोध; तात्काळ हटवण्याची मागणी

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयातील 'सेंगोल' प्रदर्शनावरून वंचित बहुजन युवा आघाडीचा तीव्र विरोध; तात्काळ हटवण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयातील 'सेंगोल' प्रदर्शनावरून वंचित बहुजन युवा आघाडीचा तीव्र विरोध; तात्काळ हटवण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

by Akash Shelar
November 5, 2026
0

मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे....

Read moreDetails
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home