मुंबई : शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे म्हटले आहे.
विधानसभेतील पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली असल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महापालिकेच्या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी प्रतिक्रीया दिली.