Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 8, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?
       

वंचितच्या प्रदेशाध्यक्षांनी मविआला पत्र लिहून विचारला सवाल!

मुंबई : महाविकास आघाडीच्या 6 मार्चला वरळी येथील फोर सिझनमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भातील महत्वाचे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्यावतीने मविआतील घटक पक्षांसाठी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लिहिले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ मोकळे आणि अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीला मिळालेल्या माहितीवरुन असे दिसून येत आहे की, महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटप अद्याप प्रलंबित आहे. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचा 10 जागांवर आणि तीनही पक्षात 5 जागांवर अशा एकूण 48 पैकी 15 जागांवर निर्णय होत नाही अशी परिस्थिती असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

रेखाताई ठाकूर यांनी या पत्रात म्हटले आहे की, भाजप-आरएसएसच्या नीच विभाजनकारी आणि लोकशाहीविरोधी अजेंड्यांविरुद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधडकपणे उभा असलेला आमचाच पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत. 2 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीच्या बैठकांनंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेतून आम्हाला वगळले गेले. महाविकास आघाडीची ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. 2018 साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब मराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तार होत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ 2 जागा देऊ केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे मतदारसंघ ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील आमच्या जिल्हा कार्यकारिणीबरोबर चर्चा केली असता असे जाणवले की, या मतदारसंघात आमचे काम असले, तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे. तसेच, त्यांना या मतदारसंघात जनाधार कमी आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी ही बाब अडचणीची आणि त्रासदायक आहे. तसेच हे अधोरेखित केले पाहिजे की मागील 2-3 निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणीही या जागा जिंकलेल्या नाहीत. जाणीवपूर्वक ‘हरणाऱ्या’ जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठिंबा मिळवायचा हेतू महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे, असे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मत झाले आहे. ‘आपली लक्षणीय मते हवीत पण जिंकू शकणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या नाहीत’ हेच मविआचे धोरण आहे हा ग्रह कार्यकर्त्यांचा होत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात, महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे. आज शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत. तसेच, कॉँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने फक्त स्वत:च्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित बहुजन आघाडीकडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘वंचित बहुजन आघाडी हा आदर देण्याच्या योग्यतेचा पक्ष नाही का?’ हा प्रश्न मी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने तुम्हा तिघांसमोर मांडत आहे. आम्ही महाविकास आघाडीचा आदरच करतो, पण सातत्याने चर्चेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही ही भावना निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीची मते हवीत, परंतु वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नको अशी ही भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

आपण ठरवून आपापसात चर्चा करावी आणि 9 मार्चच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी. आपण बदलाल ही आशा आहे. आपली युती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


       
Tags: balasaheb thoratCongressmahavikasaghadiNCPPrakash AmbedkarrekhathakurSharad PawarShivsenauddhav thakareVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सत्ता परिवर्तन महासभेत शेकडो नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !

Next Post

हाच तुमचा नवीन भारत आहे का?

Next Post
छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !

हाच तुमचा नवीन भारत आहे का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
बातमी

जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

by mosami kewat
May 6, 2026
0

पंजाब : पंजाबमध्ये मंगळवारी रात्री अल्पावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालंधर...

Read moreDetails
मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

May 5, 2026
निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

May 5, 2026
नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

May 3, 2026
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

May 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home