हंसराजमीना आणि ट्रायबल आर्मी यांच्या एक्स हँडलवरील बंदीवर आंबेडकरांची प्रतिक्रिया !
मुंबई : वेगवेगळ्या सरकारांनी वेळोवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा आणि त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत, हे ते विसरले आहेत; ह्या गोष्टी आम्ही सर्वोत्तम बाबासाहेब यांच्याकडून शिकलो असल्याची प्रतिक्रिया एक्स समाज माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. हंसराजमीना आणि ट्रायबल आर्मी यांच्या एक्स हँडलवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात हा काळा दिवस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भ्याड भाजप-आरएसएस सरकारच्या निर्देशानुसार हंसराजमीना आणि ट्रायबल आर्मीच्या X हँडलवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. दलित आणि आदिवासींचा आवाज दाबण्याची ही पहिलीच वेळ नाही. समाजातील दलित, आदिवासी आणि मुस्लीम या वंचित आणि उपेक्षित घटकांकडून जेव्हा आवाज उठवल्या जातो, तेव्हा सरकारकडून अशी बाजू मांडणाऱ्यांच्या आवाजांना दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हंसराजमीना आणि अशा प्रत्येक असहमत असलेल्या उपेक्षित आवाजामागे एकजुटीने उभे राहू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.