सर्व जाती – धर्माच्या नागरिकांची सभेला उपस्थिती !
अमरावती : अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकशाही गौरव महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. यावेळी सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. त्यातील अनेक नागरिकांच्या हातात “मी गरीब मराठा, मी ओबीसी, मी धनगर, मी शेतकरी, मी मुस्लीम”, RSS को हटाना हे, अशा आशयाचे फलक झळकले.
ओबीसींच्या लढ्याची सुरुवात बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली, मोदी को हटाना है वंचित को सत्ता में लाना है, वंचितांचे एकच ध्येय, RSS चे दूर करु भय असेही फलक सभेत झळकले आहेत. त्याचबरोबर, सर्वच जाती धर्माच्या समुहांनी या महासभेला उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.
माध्यमांच्या आणि पोलिसांच्या माहितीनुसार सव्वा एक लाख जनतेची उपस्थिती होती. मात्र, यापेक्षा हा आकडा जास्त आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना संपूर्ण राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठा, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी आणि दलित या सर्वच समुदायांच्या लोकांची त्यांच्या सभांना लक्षणीय उपस्थिती असते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात वंचित बहुजन आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.