Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर…

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2024
in राजकीय
0
काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर…
       

अमरावतीच्या सभेतून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला सल्ला !

अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेल मध्ये जातील. काँग्रेस – राष्ट्रवादी – उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला तर, तुम्ही जेल मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथील लोकशाही गौरव महासभेतून महाविकास आघाडीला दिला आहे.

दोन वर्ष ओलांडली तरीही, काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना यांच्यात समझोता झाला नाही. अजूनही लोकसभेच्या 48 जागा यांना वाटता आल्या नाहीत. मला राहून राहून शंका येते की, यांना खरचं मोदी आणि भाजपला हरवायचं आहे का ?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आम्ही कुरबानीचा बकरा नाही. तुम्ही तुमच्या जागा वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या आम्ही ज्यांच्याकडे गेल्यात त्यांच्यासोबत वाटाघाटी करू घेऊ आणि नाही जमलं तर 48 च्या 48 जागा आम्ही लढवायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

वंचित बहुजन आघडीपैकी जेल मध्ये एकही जाणार नाही मात्र, जेल मध्ये सोनिया गांधींपासून इतर सगळे जातील. मोदी वाघ म्हटल तरी खात आहे आणि वाघोबा म्हटल तरी खात आहे. मग, दोन हात करायला कशासाठी भीत आहात? असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे.

भाजपला हरवयाची काँग्रेसची ईच्छा आहे का ? असा सवाल करत त्यांनी सांगितले की, चार जागा कमी मिळाल्या किंवा चार जागा जास्त मिळाल्या तर फरक काय आहे?तुमच्या मानगुटीवर कारवाईची तलवार आहे. एकत्र लढलात तर ती तलवार उडवू शकता. पण, भीत भीत लढलात तर ती तलवार तुमच्या मानगुटीवर पडल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही आम्हाला जर चर्चेत घेतलं तर, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जसं इथल्या गरीब मराठ्याला वापरत आलात त्याच पद्धतीने जर वंचितला वापरायचा विचार केला तर, मोदी सोबत आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात ठेवा. असा ईशारा त्यांनी काँग्रेस आणि इतर प्रस्तापित पक्षांना दिला आहे.

भारत जोडो यात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपणार आहे ? ती या महिन्यात संपणार आहे की, मार्च मध्ये संपणार आहे ? असे म्हणत या भारत जोडो यात्रेला नरेंद्र मोदी पावनखिंडीत अडवल्याशिवाय राहणार नाही.

राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमावर लक्ष वेधत त्यांनी म्हटले की, 22 तारखेच्या निमित्ताने देशात धार्मिक माहोल उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. तो किती यशस्वी अयशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल.

निवडणुका तोंडावर आले असताना त्याला तोंड देण्याच्या ऐवजी काँग्रेसवाले भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत त्या भारत यात्रेमधून आरएसएस बीजेपीवाले हरणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत,असे त्यांनी नमूद केले.

कंत्राटी कामगारांना त्यांनी सवाल केला की,खाजगीकरणाचे धोरण असणाऱ्यांच्या पक्षाच्या बाजूने जाणार की, इथं कल्याणकारी, सार्वत्रिकता मागणी करणाऱ्या पक्षांच्या बाजूने जाणार ? वंचित बहुजन आघाडी हाच एक मार्ग तुम्हाला पर्मंनंट करू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

फुले – शाहू – आंबेडकर ही चळवळ मान सन्मानाची –

फुले, शाहू, आंबेडकर ही चळवळच मान सन्मानाची चळवळ असल्याचे त्यांनी या सभेत सांगितले.
भाजप आणि आरएसएस मान सन्मानाची गोष्ट करत नाहीत. आम्ही फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही गुलामी संपवली आहे आणि मानवता टिकवली आहे असेही त्यांनी नमूद केले.


       
Tags: amravatiCongressMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

सकल मराठा समाजासाठी लढणारे बाळासाहेब आंबेडकर !

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेत झळकले ‘मी मराठा, मी ओबीसी’चे फलक !

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेत झळकले ‘मी मराठा, मी ओबीसी’चे फलक !

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेत झळकले 'मी मराठा, मी ओबीसी'चे फलक !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन
बातमी

महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन

by mosami kewat
September 5, 2026
0

अकोला : पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अकोला महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत तापडिया नगर येथील...

Read moreDetails
ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

September 5, 2026
‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

‘जय भीम Gen Z!’: वंचित बहुजन आघाडीचा नवा उपक्रम

September 5, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक

September 5, 2026
समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

September 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home