अकोला :शहरात १५ नोव्हेंबरला एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली होती.सदर घटनेची माहिती १७ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना मिळताच त्यांनी यावर ऍक्शन घेत पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. या प्रकरणातील पीडीतेला खदान पोलीस ठाण्यात सुमारे १२ तास वैद्यकीय चाचणी शिवाय ताटकळत ठेवण्यात आले होते. यावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अकोल्यातील हे महिला अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पीडीतेचे मुंडण केलेच नाही असे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आणि लोकमत ने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
कोणताही अत्याचार मग तो कौटोबीक असो किंवा सामाजिक तो राजकीय अत्याचारच असतो अशी स्त्री मुक्ती चळवळीची शिकवण आहे. जेव्हा स्त्री अत्याचार होतो तेव्हा चळवळ तिथल्या राज्यकर्त्यांना व प्रशासकांना धारेवर धरते तेव्हाच महिलांना न्याय मिळतो. मनुवादी विचारांचं सरकार असल्याने महिला अत्याचारांचे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळली जात आहेत हा आमचा गंभीर आरोप आहे. असेही त्या म्हटल्या आहेत.