Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हेच आमचे लक्ष्य – सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबाद: जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा हेच आमचे लक्ष्य – सुजात आंबेडकर
       
करंजखेड : औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी करंजखेड येथे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा पार पडली.

या सभेत बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्वसामान्य, वंचित आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली जाईल. (Sujat ambedkar election campaign(

पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील. यासोबतच प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सुविधा सक्षम केल्या जातील, प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट केली जातील आणि गोरगरिबांना वेळेत उपचार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस योजना राबवण्यात येतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी योग्य हमीभाव, पीकविमा आणि नुकसानभरपाईसाठी प्रभावी धोरण राबवण्याचे आश्वासन दिले. “शेतकरी सुखी तर देश सुखी” या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडी काम करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Sujat ambedkar election campaign)

या जाहीर सभेस वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष अंजन साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सिल्लोड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वंचित बहुजन आघाडीच्या घोषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Tags: aurangabadElection campaignMaharashtrapolticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पंचायत समितीवर मोर्चा; गटविकास अधिकाऱ्यांसमोर नोटिसांची होळी, वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक!

Next Post

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचितचे रणशिंग; वैजापूरच्या सभेत सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन

Next Post
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचितचे रणशिंग; वैजापूरच्या सभेत सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचितचे रणशिंग; वैजापूरच्या सभेत सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home