Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल
       

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेसवे ३३ तास ठप्प होणे, हे आपल्या ‘विकसित’ प्रशासनाचे लक्षण आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या  माध्यमातून विचारला आहे.

प्रशासकीय सज्जतेवर प्रश्नचिन्ह –

एक्सप्रेस वेवर उलटलेल्या टँकरमधील ज्वलनशील ‘प्रोपेलिन गॅस’ सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यासाठी NDRF, SDRF, BPCL आणि महामार्ग पोलिसांना तब्बल ३३ तास लागले. या विलंबावर बोट ठेवत आंबेडकर म्हणाले की, प्रशासन किती लोकधार्जिणे आणि कार्यक्षम आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इतका वेळ लागणे हे प्रशासकीय समन्वयाचा अभाव स्पष्ट करते. (Prakash ambedkar)

प्रवाशांचे हाल आणि टोल वसुलीचा संताप

या ३३ तासांच्या काळात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालके अन्न-पाण्यावाचून महामार्गावर अडकून पडली होती. या परिस्थितीवर संताप व्यक्त करताना त्यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, हजारो प्रवासी अडकलेले असताना त्यांना साध्या स्वच्छतागृहाच्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. रस्ता पुढे बंद असतानाही वाहनांना एक्सप्रेस वेवर प्रवेश का दिला गेला? ही प्रशासनाची मोठी चूक आहे. (Prakash ambedkar)

एकीकडे रस्ता ठप्प असताना दुसरीकडे टोल वसुली मात्र निर्धोकपणे सुरू होती, यावरून त्यांनी प्रशासनाच्या संवेदनशून्यतेवर प्रश्न उपस्थित केले. मुंबई आणि पुण्यातील नुकत्याच निवडून आलेल्या किती लोकप्रतिनिधींनी या संकटकाळात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली? असा सवाल करत त्यांनी राजकीय नेत्यांच्या उदासीनतेवरही हल्ला चढवला. (Prakash ambedkar)

३३ तास नागरिक रस्त्यावर अडकून पडणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून ती एक गंभीर प्रशासकीय चूक असल्याचे सांगत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.


       
Tags: governmentHighwayMaharashtramumbaiMumbai Pune HighwaypeoplePoliticalPrakash AmbedkarpuneroadTrafficVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचितचे रणशिंग; वैजापूरच्या सभेत सुजात आंबेडकरांचे परिवर्तनाचे आवाहन

Next Post

Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

Next Post
Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

Aurangabad: 'वंचित'ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home