Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोला शहरातील महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वंचितच्या प्रयत्नांनी आरोपीला अटक!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 18, 2023
in बातमी
0
अकोला शहरातील महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न !अल्पवयीन मुलीवर बलात्कार; वंचितच्या प्रयत्नांनी आरोपीला अटक!
       

अकोला – शहरात १५ नोव्हेंबरला एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. घटना घडून दोन दिवस उलटले तरी पीडित असलेले कुटुंब गुंड प्रवृत्तीच्या आरोपीच्या दहशतीला घाबरून तक्रार देण्यास घाबरत होते. सदर घटनेची माहिती १७ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना मिळताच त्यांनी यावर ऍक्शन घेत पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री ३ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून गुन्हा दाखल होऊन आरोपीच्या अटकेपर्यंत त्यांनी ठिय्या दिला.

यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या अरुंधतीताई शिरसाठ, प्रभाताई शिरसाट, पुष्पाताई इंगळे, वंदनाताई वासनिक, आम्रपालीताई खंडारे, सचिन शिराळे, गजानन दांडगे, गणेश सपकाळ, आशिष मांगूळकर, सुनंदाताई चांदणे हे पदाधिकारी हजर होते.

आरोपीने अल्पवयीन मुलीचे केस कापले व सलूनमध्ये नेऊन तिचे टक्कल केले, सिगारेटचे चटके दिले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे अकोल्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी आक्रमक होतं पीडित मातंग कुटुंबियांच्या बाजूने उभे राहत आरोपीला अटक केली.
अश्या मस्तावलेल्या गुंड प्रवृत्तीपासून अकोलामध्ये महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतो.

सत्तेत मस्तावलेले राजकारण्यांमुळे महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न अकोल्यात निर्माण झालाय. कुठेही अन्याय-अत्याचार झाला, तर पीडितांच्या बाजूने शेवटपर्यंत लढा लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ठाम उभी आहे.


       
Tags: AkolaakolapolicebjpDevendra FadanvisEknath ShindeMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

आरक्षणांच्या आंदोलनांना हिंसक वळण देण्याची इथल्या राज्यकर्त्यांची खेळी – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post

तुमचा बोलावता धनी कोण ? राज ठाकरेंना ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल !

Next Post
तुमचा बोलावता धनी कोण ? राज ठाकरेंना ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल !

तुमचा बोलावता धनी कोण ? राज ठाकरेंना ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज
अर्थ विषयक

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

by mosami kewat
July 28, 2026
0

- संजीव चांदोरकर जेन झी आंदोलनाच्या निमित्ताने !(मी कॉलेजमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या संवादावर आधारित एक जुनी पोस्ट ) “कोणताही...

Read moreDetails
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

July 27, 2026
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home