Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 3, 2022
in राजकीय
0
जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर
       

नांदेड मधील धम्म मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद !

नांदेड – देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून आहे. येथील जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नांदेड येथील नवा मोंढा मैदानावर ५ नोव्हेंबर रोजी धम्म मेळावा पार पडला. यावेळी अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर, अशोक सोनोने, फारुख अहमद, अमित भुईगळ, नांदेडचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबरे, शिवा नरंगले, भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हाध्यक्ष निवृत्त न्यायाधीश यशवंत चावरे, यांच्यासह अनेकांची विचारपीठावर उपस्थिती होती.

ऍड. आंबेडकर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशाला तोडू पाहत असून येथील माणसाची डोकी भडकविण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. मोहन भागवत हे हिंदू धर्माला वैदिक धर्माकडे घेऊन जात असून सनातनी मानसिकता घडवू पाहत आहे. भारताला अफगाणिस्तानला जोडणे म्हणजे बॉम्ब ब्लास्ट संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न तर मोहन भागवत करत नसावे ना? असा सवाल अॅड. आंबेडकर यांनी केला.

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, मात्र येथील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम त्यांनी करावे, केवळ पायी चालून उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात आरक्षण वाचविण्याचे थोतांड नाटक सुरू असून भाजपने कोर्टाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवले. आगामी काळात पैसे वाटून निवडणुका जिंकणाऱ्या पुढाऱ्यांची व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत वंचित समूहाची सत्ता येणार नसल्याचे अॅड. आंबेडकर यांनी आवर्जून सांगितले. भाजपनं पाम तेलात ४५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, याबाबत राहुल गांधी यांनी मुद्दा उपस्थित करायला हवा. भाजप सरकार हे सामान्यांचे नसून लुटारू असल्याचा घणाघात ही आंबेडकर यांनी केला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीला येथील शेतकरीच जबाबदार असून शेतकऱ्यांनी जातीच्या सत्तेला महत्व दिल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. शेटजी आणि भटजी हे मुद्दाम ऊस असो किंवा कापूस यास भाव देत नसल्याने कापूस व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, त्याच शेतकऱ्यांच्या भरवश्यावर इथेनॉलमधून कारखानदार गब्बर होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ३ हजार भाव द्यावा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

१. केंद्राचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक. आफ्रिकेतून मुबलक प्रमाणात कापसाची आयात केली जात आहे. त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. आयात बंद केली तर कापसाचे भाव वाढू शकतात. कापूस, उसाला भाव नाहीत, पण या विषयावर कोणी बोलायला तयार नाही.

२. ३७० कलम रद्द केल्यानंतर मलेशियाने ही कृती मान्य केली नाही. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाकडून पाम तेलाची आयात बंद केली. यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे.

३. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पदयात्रा काढण्यापेक्षा देशातील कष्टकरी, मजूर, शेतकरी आणि सामान्यांचे प्रश्न पंतप्रधानांना विचारावेत, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

४. दलित, मुस्लिम, आदिवासी असे उच्चारून समानता नसल्याचेच आपण दाखवितो. त्यामुळे समानता आणण्यासाठी विधायक प्रयत्नांची गरज आहे. या देशात तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी ओबीसींना आरक्षण दिले. पण, शेठजी-भटजीच्या सरकारने हे आरक्षण काढण्याचा घाट घातल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.


       
Tags: Bharat Jodo YatraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

रामलिंग टेकाळे यांचे निधन

Next Post

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

Next Post
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !
बातमी

RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

by Akash Shelar
May 18, 2026
0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात Board of Control for Cricket in India (BCCI) ला माहिती अधिकार कायदा...

Read moreDetails
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

May 18, 2026
“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

May 16, 2026
आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

May 14, 2026
देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

May 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home