Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आरक्षणाशिवाय घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची झालेली पद भरती रद्द करा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 5, 2022
in बातमी
0
आरक्षणाशिवाय घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची झालेली पद भरती रद्द करा !
       

घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची आरक्षणाशिवाय झालेली पद भरती रद्द करून नव्याने राबविण्यात यावी; वंचित युवा आघाडीची राज्यपाल आणि मुख्यमंत्री ह्यांच्या कडे तक्रार.

राज्यात घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांच्या निवड प्रक्रिया अनेक महाविद्यालयात पार पडली आहे. मागील काही वर्षा पासून ही नियुक्ती आरक्षणाशिवाय होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून आजवर विनाआरक्षण करण्यात आलेली पद भरती रद्द करा अशी मागणी वंचित बहूजन युवा आघाडीच्या वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली असून नव्याने आरक्षण लागू करून ही पदभरती करण्यात यावी आणि आरक्षणा शिवाय पदभरती करणाऱ्या महाविद्यालय संचालक ह्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. अनुदानित अशासकीय महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेत बहुतांश महाविद्यालयांनी सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी न करता निवड केल्याने पात्र उमेदवार सामाजिक आरक्षणापासून वंचित राहिले आहेत. ह्या बाबतीत अनेक संघटना तक्रारी करतात मात्र त्याची दखल घेतली जात नाही. महाविद्यालयात मात्र ह्या पदभरती बेकायदा सुरू आहेत.

सहायक प्राध्यापकांच्या मुलाखतीत सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी करणे ही महाविद्यालय प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्या महाविद्यालयांनी सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही, अशा महाविद्यालयाची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण बहुतांश महाविद्यालयांत अनुसूचित जाती, जमाती, मागास प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी तासिका तत्त्वावरील सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती सामाजिक आरक्षणाला खो देत ही निवड केली आहे, ह्या जाहिराती प्रकाशित होत असताना सामाजिक आरक्षण डावलून पद भरती बाबत विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे मूग गिळून गप्प आहे .ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत.

करिता गेल्या दोन वर्षात झालेल्या पद भरती प्रक्रिया ह्याची चौकशी करण्यात यावी तसेच आता सामाजिक आरक्षण शिवाय झालेली पदभरती रद्द करून आरक्षण सहित ही पदभरती करण्यात यावी करीता तक्रार राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री ह्यांना ई मेलवर पाठविण्यात आल्या आहेत.

राजेंद्र पातोडे, प्रदेश महासचिव, वंचित बहूजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश. 9422160101

#वंचीत #VBA2022 #प्राध्यापकनियुक्ती #आरक्षण #नियुक्ती


       
Tags: Rajendra PatodereservationVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार !

Next Post

वंचित बहुजन आघाडी पुसद शहर व यवतमाळ जिल्हा पश्चिम संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन

Next Post
वंचित बहुजन आघाडी पुसद शहर व यवतमाळ जिल्हा पश्चिम संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन

वंचित बहुजन आघाडी पुसद शहर व यवतमाळ जिल्हा पश्चिम संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई
बातमी

सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई

by mosami kewat
July 19, 2026
0

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला...

Read moreDetails
आळशी नव्हे, संधीपासून वंचित! उच्च शिक्षणाच्या आकडेवारीतून उलगडलेले वास्तव

आळशी नव्हे, संधीपासून वंचित! उच्च शिक्षणाच्या आकडेवारीतून उलगडलेले वास्तव

July 19, 2026
पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास

पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावत रचला नवा इतिहास

July 19, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; रबाळे येथील आदिवासीपाड्यातील शौचालय दुरुस्तीला सुरुवात!

July 19, 2026
E10 पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा आणि इंधनाचे दर कमी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

E10 पेट्रोलचा पर्याय कायम ठेवा आणि इंधनाचे दर कमी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home