महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून नवीन माहिती देत खळबळ उडवून दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी आपल्या ट्विट मधून ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?’ असा थेट प्रश्न विचारून सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यात घोडं कुठं अडलंय याबाबत माहिती दिल्याची चर्चा आहे.
https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1539818320454909954?t=zwyfMXSvZigj98uouZ9Czg&s=19
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाला भाजप सोबत सत्ता स्थापण्यासाठी भाजपमध्ये विलीन व्हायची अट घालण्यात आली असल्यामुळे शिंदेंसमोर मोठा पेच निर्माण झाला असल्याचे समजते. भाजपमध्ये विलीन झाल्यास आपल्याकडे चालून आलेली नेतृत्वाची संधी जाईल असे शिंदेंना वाटते आहे. अश्या परिस्थितीत एकनाथ शिंदे भाजप मध्ये विलीन होऊन देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारतील की स्वतंत्रपणे आपल्या गटाचे नेतृत्व करतील हे पाहण्यासारखे ठरेल.