Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

mosami kewat by mosami kewat
September 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 
       
मुंबई : फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे विचारवंत, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित १ ऑक्टोबर रोजीचा ‘आम्ही इराण सोबत’ या मोर्च्याबद्दल विचारायला लागलेत. चर्चा करायला लागलेत. चळवळ ही व्यक्ती केंद्रीत मुद्द्यांवर नसून सार्वत्रिक मुद्द्यांवर देखील आहे.

‘आम्ही इराण सोबत’ आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे. आम्ही देश म्हणून इराण बरोबर का ? कारण, इराण आमच्या सोबत आहे म्हणून. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे मांडली आहे. 

ॲड. आंबेडकरांनी ट्विट मध्ये खालील मुद्दे मांडले – 

• काश्मीरच्या प्रश्नावर इराणने जागतिक पातळीवर भारताची बाजू घेतली.

• इराण हा भारताला उधार तत्वावर क्रूड ऑईल देणारा देश आहे.

आज अमेरिका-इस्त्रायल इराणला संपवण्याची भाषा करताय. अशा परिस्थितीत देश म्हणून आपण इराण सोबत उभे राहिले पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस-भाजपचे सरकार हे उघडपणे इस्रायल सोबत आहेत. या युद्धात त्यांनी इस्रायलला शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. ही घटना वंचित बहुजन आघाडीने बाहेर काढली.

युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या तर सामान्य लोकांचे घरगुती बजेट कोलमडून पडेल. इराणकडून कच्चे तेल स्वस्त आणि वेळेत आले, तर महागाईची झळ सामान्य माणसाला बसणार नाही.

१ ऑक्टोबरचे आंदोलन हे देशातील दोगले सरकारला उघडे पाडण्यासाठी आहे. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत भारतीय जनता इराण सोबत आहे, हे सांगण्यासाठी सर्वांनी १ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे जमावे आणि आपले मत नोंदवावे.

Tags: EconomicsIranMaharashtraMumbai protestPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

Next Post

सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

Next Post
सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बातमी

नवीन श्रावस्ती नगरातील १५० हून अधिक कुटुंबे बेघर होण्यापासून वाचली; वंचितच्या नगरसेवकांसह सम्यकच्या नेत्यांच्या लढ्याला यश

by mosami kewat
September 17, 2026
0

नांदेड : गट क्रमांक ६१ (अ), नवीन श्रावस्ती नगर परिसरात मागील जवळपास २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बौद्ध समाजातील १५० हून...

Read moreDetails
‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

September 17, 2026
सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

September 17, 2026
आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

September 17, 2026
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home