Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

एससी-एसटीच्या 4600 कोटींचा निधी पळवणाऱ्या मंत्री संजय शिरसाट, अशोक उईके यांच्या घरांवर SC, ST समूहांचा धडक मोर्चा!

mosami kewat by mosami kewat
September 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
एससी-एसटीच्या 4600 कोटींचा निधी पळवणाऱ्या मंत्री संजय शिरसाट, अशोक उईके यांच्या घरांवर SC, ST समूहांचा धडक मोर्चा!
       
औरंगाबाद : अनुसूचित जाती आणि जमातीच्या (एससी-एसटी) विकासासाठी राखीव असलेला ₹४६०१.१३ कोटींचा निधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवण्यात आल्याचा तीव्र निषेध नोंदवत अनुसूचित जाती, जमातीच्या समूहांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या औरंगाबाद येथील घरावर तर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील घरावर धडक मोर्चा नेला.

औरंगाबाद येथील आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी राज्य सरकारवर थेट हल्लाबोल केला. एससी-एसटीच्या निधीचा काय घोटाळा केला, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका पातोडे यांनी मांडली. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवून मागासवर्गीय समाजाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करत आंदोलकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झाला असून यात SC, ST समूहांचा निधी पळवण्यात आला तसेच राज्य सरकारने या योजनेसाठी मोठी तरतुद करून 1500 कोटी रुपये अतिरिक्त ठेवले होते, असे असतांना ही आदिवासी विभागातून 1 हजार कोटी रुपये तर समाज कल्याण विभागातून 3500 कोटी रुपये पळवले आहेत. राज्य सरकारच्या ह्या योजनेवर केंद्र सरकारच्या कॅगने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. औरंगाबाद येथील मोर्च्यात पोलिसांनी विनाकारण आंदोलनकर्त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

दुसरीकडे यवतमाळ येथेही वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात एससी-एसटी समाजाने आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या घरावर मोर्चा नेला. एससी-एसटीच्या हक्काच्या ₹४६०१.१३ कोटी निधीची लूट करणाऱ्या कमिशनखोर धोरणाचा धिक्कार करत आंदोलकांनी मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील घरासमोर निदर्शने सुरू केली आहेत. राज्य शासनाने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, प्रा. नागोराव पांचाळ, जितरत्न पटाईत, दीपक डोके, ज्ञानेश्वर कवठेकर, उत्तम वनशिवे, नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेविका करुणा जाधव, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, पंकज बनसोडे, सतीश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Ladki Bahin Scheme MaharashtraMaharashtraPoliticalsanjay sirsathSC-ST-FundsVanchit Bahujan Aghadi
Previous Post

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

Next Post

नांदेड : जाहीरनाम्यातील वचनपूर्तीला सुरुवात; शिवरत्न जिवाजी महाले पुतळ्यासाठी वंचितच्या सहाही नगरसेवकांचा पुढाकार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 
बातमी

आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

by mosami kewat
September 17, 2026
0

मुंबई : फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे विचारवंत, कार्यकर्ते, अधिकारी वर्ग हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित १ ऑक्टोबर रोजीचा 'आम्ही इराण...

Read moreDetails
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

September 17, 2026
मलकापूर–शिवणी परिसरात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी; नगरसेविका जयश्री बहादूरकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर 

मलकापूर–शिवणी परिसरात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी; नगरसेविका जयश्री बहादूरकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर 

September 17, 2026
नांदेड : जाहीरनाम्यातील वचनपूर्तीला सुरुवात; शिवरत्न जिवाजी महाले पुतळ्यासाठी वंचितच्या सहाही नगरसेवकांचा पुढाकार

नांदेड : जाहीरनाम्यातील वचनपूर्तीला सुरुवात; शिवरत्न जिवाजी महाले पुतळ्यासाठी वंचितच्या सहाही नगरसेवकांचा पुढाकार

September 17, 2026
एससी-एसटीच्या 4600 कोटींचा निधी पळवणाऱ्या मंत्री संजय शिरसाट, अशोक उईके यांच्या घरांवर SC, ST समूहांचा धडक मोर्चा!

एससी-एसटीच्या 4600 कोटींचा निधी पळवणाऱ्या मंत्री संजय शिरसाट, अशोक उईके यांच्या घरांवर SC, ST समूहांचा धडक मोर्चा!

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home