Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
September 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर
       
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटके विमुक्त राज्यस्तरीय परिषदेत बोलताना भटक्या-विमुक्त समूहाला स्वाभिमानाची आणि राजकीय जागरूकतेची हाक दिली आहे. निवडणुकीतील पैशांच्या लाचार राजकारणावर कडाडून हल्ला चढवत त्यांनी समाजाला स्वतःच्या हक्कांची आणि ताकदीची जाणीव करून दिली.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर आपल्याला स्वतःच्या कष्टाने दिवसातून दोन वेळचे जेवण हक्काने मिळते आणि कोणापुढेही हात पसरण्याची गरज पडत नाही, तर मग निवडणुकीत मतदानाच्या दिवशी आपण कोणासमोर हात का पसरवतो? आपण खाऊन-पिऊन सुखी असताना आणि कोणावरही अवलंबून नसताना केवळ पैशांसाठी मते विकणे हे अत्यंत खेदजनक आहे. ही लाचारी आणि गुलामीची मानसिकता आता भटक्या-विमुक्त समूहाने कायमची सोडून दिली पाहिजे.

गावागावांतील भटक्या-विमुक्त समूहाने एकत्र येऊन निवडणुकीत वाटले जाणारे पैसे स्वीकारणार नाही आणि आपला ईमान कधीही विकणार नाही, अशी ठाम आणि खंबीर भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या दिवशी हा समाज ही स्वाभिमानाची भूमिका घेईल, त्या दिवशी भटक्या-विमुक्तांच्या हक्काच्या बजेटचे तब्बल ४१ हजार कोटी रुपये कोणाकडेही न मागता आपोआप मिळतील, असा विश्वासही त्यांनी या परिषदेत व्यक्त केला.

Tags: MaharashtraPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

Next Post

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

Next Post
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home