Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे : धुके जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक आणि वसतिगृहाशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने धुळे येथील निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये समाज कल्याण साहाय्यक आयुक्त पदावरील रिक्त जागेवर तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Also Read : मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

तसेच, वसतिगृह निर्वाह भत्ता वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक विद्यार्थ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे मागील प्रलंबित निर्वाह भत्ता व्याजासह तातडीने अदा करण्यात यावा आणि यापुढे निर्वाह भत्ता नियमितपणे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

धुळे जिल्ह्यातील वसतिगृहांची क्षमता अपुरी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना निवासाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वसतिगृहांची क्षमता वाढवून SC, ST, OBC, VJNT आणि मायनॉरिटी प्रवर्गातील किमान १० हजार विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रा. संदीप रामराजे, जिल्हा संघटक शंकर खरात (वंचित बहुजन आघाडी), जिल्हाध्यक्ष आबा निकुंबे (वंचित बहुजन युवा आघाडी, नंदुरबार), जिल्हाध्यक्ष रोहित बागुल (सम्यक विद्यार्थी आंदोलन), धुळे जिल्हा महासचिव प्रणील महिरे, तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे (वंचित बहुजन युवा आघाडी, शहादा), नंदुरबार युवा महासचिव महमूद, तसेच आनंद अमृतसागर, राकेश संभाजी, गणेश अमृतसागर यांच्यासह आंदोलनाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Also Read : मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

Tags: DhuleEducationMaharashtraPoliticalSamyak Vidyarthi Andolanstudent
Previous Post

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

Next Post

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Next Post
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न
बातमी

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

by mosami kewat
October 16, 2026
0

दक्षिण सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. सोमनाथ...

Read moreDetails
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home