Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

mosami kewat by mosami kewat
August 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला जाब

पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण तीव्र झाले आहे. उपोषणकर्ते विद्यार्थी राहुल धनवे यांची प्रकृती आणखी खालावली असून, त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, त्यांच्या यकृतावरही परिणाम होण्यास सुरुवात झाल्याचे डॉक्टरांनी सूचित केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत म्हटले की, VBA मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. विद्यार्थ्यांची सन्मान, न्याय, सुरक्षित वसतिगृहे, विमा, शैक्षणिक मदत आणि समान संधी यांसाठीची लढाई पूर्णपणे न्याय्य असल्याचे त्यांनी म्हटले.

Also Read : जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

तसेच, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष किंवा त्यांचा आवाज दडपला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सवाल उपस्थित केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी अद्याप संवाद का साधला गेला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थ्यांप्रती सरकारची उदासीनता ही आदिवासीविरोधी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे का, असा थेट सवालही त्यांनी केला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात आमरण उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे आज, मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी भेट घेणार आहेत. यावेळी ते उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या व आंदोलनाची भूमिका जाणून घेणार असून, त्यानंतर दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.  दरम्यान, सरकारने विद्यार्थी प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा आणि उपोषणकर्त्या विद्यार्थ्याच्या प्रकृतीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Also Read : पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

विद्यार्थ्यांच्या सन्मान, न्याय, सुरक्षित वसतिगृहे, विमा, शैक्षणिक मदत आणि समान संधी यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारकडून आंदोलनाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी प्रतिनिधींनी केला आहे. दरम्यान, विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ भांडे, सूरज कोकणे, नीलेश सोनवणे, रवींद्र लोटे यांच्यासह अन्य विद्यार्थी आदिवासी विकासमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, सुमारे आठ तास प्रतीक्षा करूनही त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Indefinite Hunger StrikeManjariManjari Stud Farmpunestudent protestSujat AmbedkarsujatambedkarTribal HostelTribal StudentsTribal Students MovementTribal Students ProtestVanchit Bahujan Aghadi
Previous Post

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

Next Post

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home