पुणे : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची वंचित बहुजन आघाडीने दखल घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी भेट देणार आहेत.
सुजात आंबेडकर हे उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या, आंदोलनाची सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ठीक ३ वाजता आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह परिसरात ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...
Read moreDetails






