Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

mosami kewat by mosami kewat
August 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरलेला मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने अंदुरे याचे अपील सुनावणीसाठी दाखल करून घेताना त्याला जामीन मंजूर केला, तसेच मुख्य अपील प्रलंबित असेपर्यंत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली.

पुणे विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सचिन अंदुरे याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करत जामिनासाठी अर्ज केला होता. या अपिलावर सुनावणी करताना खंडपीठाने अंदुरेचा जामीन अर्ज मंजूर केला आणि सीबीआयच्या तपासातील व पुराव्यांमधील अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. (Narendra Dabholkar Murder Case)

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, घटनेच्या वेळी उपस्थित असल्याचा दावा करणाऱ्या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी घटनेनंतर तब्बल आठ ते नऊ वर्षांनी पहिल्यांदाच न्यायालयात आरोपीची ओळख पटवली होती. शिवाय, सीबीआयने या साक्षीदारांना दाखवलेल्या छायाचित्रांमध्ये अंदुरेची ओळख पटलेली नव्हती. तसेच, अंदुरेने एका साक्षीदारासमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा सीबीआयने केला होता; मात्र ही कबुली घटनेनंतर तब्बल पाच वर्षांनी आणि अंदुरेच्या अटकेनंतर समोर आली होती, ज्याला कोणताही ठोस पाठपुरावा किंवा स्वतंत्र पुरावा नव्हता, असे उच्च न्यायालयाला आढळले.

Also Read : साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब

याशिवाय तपास यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, बॅलिस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार मुंब्रा पोलिसांकडून जप्त केलेल्या पिस्तूल आणि गोळ्यांचा मेळ डॉ. दाभोलकरांच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्यांशी बसत होता. मात्र, तपास यंत्रणेने या अत्यंत महत्त्वाच्या दिशेने पुढे कोणताही तपास केला नाही अथवा त्याबद्दल न्यायालयात योग्य स्पष्टीकरण दिले नाही. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने सचिन अंदुरेची जन्मठेपेची शिक्षा प्रलंबित अपिलादरम्यान स्थगित करत त्याला जामीन मंजूर केला. (Narendra Dabholkar Murder Case)

Tags: Bombay High CourtMaharashtramumbaiNarendra DabholkarNarendra Dabholkar Murder CasePoliticalPrakash Ambedkarpune
Previous Post

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

Next Post

बल्लारपुरात स्वातंत्र्यदिनी १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

Next Post
बल्लारपुरात स्वातंत्र्यदिनी १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

बल्लारपुरात स्वातंत्र्यदिनी १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बल्लारपुरात स्वातंत्र्यदिनी १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात
बातमी

बल्लारपुरात स्वातंत्र्यदिनी १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

by mosami kewat
August 19, 2026
0

चंद्रपूर : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यागमूर्ती माता रमाई बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन...

Read moreDetails
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

August 19, 2026
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

August 19, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब

August 19, 2026
भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल मांडेगाव शाखेकडून स्वातंत्र्यदिन आणि वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल मांडेगाव शाखेकडून स्वातंत्र्यदिन आणि वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी

August 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home