Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

mosami kewat by mosami kewat
August 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

पुणे : महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात, मांजरी येथील वस्तीगृह परिसर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन १३ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले होते. आज या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. मात्र विद्यार्थांना अजूनही न्याय मिळालेला नाही. दरम्यान, या आंदोलनाला पुण्यातील वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आदिवासी विद्यार्थी आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला हा संघर्ष सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार आणि आदिवासी समाजाच्या भवितव्याशी निगडित असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने म्हटले आहे.

Also Read : बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

  • गडचिरोली येथील आश्रमशाळेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
  • आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचा १० कोटी रुपयांचा विमा काढण्यात यावा.
  • प्रलंबित १२,५०० तसेच इतर आदिवासी नोकरभरती प्रक्रिया तातडीने राबवावी आणि कार्यमुक्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करावी.
  • PESA कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
  • रक्ताच्या नातेसंबंधावर आधारित जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच बंजारा अभ्यास समितीसंदर्भातील शासन निर्णय रद्द करावा.
  • शासन निर्णयातील वयाची अट रद्द करावी.

    शासनाने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी लवकरात लवकर संवाद साधावा आणि त्यांच्या सर्व मागण्यांवर ठोस, लेखी आणि कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. यावेळी मागण्यांवर योग्य तो निर्णय न झाल्यास संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा संघर्ष अधिक व्यापक करण्याचा इशाराही सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Tags: MaharashtrapunePune Protestpune tribal studentsSamyak Vidyarthi AndolanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post

आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक
बातमी

आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

by mosami kewat
August 19, 2026
0

विद्यार्थ्यांच्या हातात ‘किताब’ द्या, तुमच्या राजकारणाचा ‘हिशोब’ नाही!हिंगोली : हिंगोलीत शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर...

Read moreDetails
पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

August 19, 2026
बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 19, 2026
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

August 18, 2026
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home