बीड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील आष्टी येथील विविध कार्यकर्त्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याचा निर्धार केला.
यावेळी प्रदीप वक्ते, हाकीम, सोहेल, नावाब आरेकश, सिद्धार्थ मोरे, प्रदीप वक्ते संकनपुरी यांच्यासह आष्टीतील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, जिल्हा सचिव शेख जमीर, ज्येष्ठ नेते चोखाजी सौंदर्य नाना, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, आष्टी शहराध्यक्ष गणेश वैधे, अजित पाईकराव, बाळासाहेब वाघमारे, शाकेर मणियार, तारेख शेख, युसुफ अन्सारी, अवेज लाला कुरेशी, दीपक दवंडे, करण मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






