अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या प्रवेश कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
बालमटाकळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मधुकर घोरपडे यांच्यासह संजय बबन मिसाळ, ज्ञानेश्वर विठ्ठल मिसाळ, श्रावण अर्जुन मिसाळ, विकास प्रभाकर घोरपडे, रोहन बाबासाहेब मिसाळ तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, तालुका उपाध्यक्ष विशाल इंगळे, इन्सानियत फाउंडेशनचे शेख ईस्माईल, शेख मुर्तजा, भारतीय बौद्ध महासभेचे अरुण भोंगळे, बाळासाहेब धस, जीवन आंगरख, गणेश सुभाष भोंगळे, बडू शिंदे, रज्जाक सय्यद यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका उपाध्यक्ष विशाल इंगळे यांनी मानले. या प्रवेशामुळे शेवगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळणार असल्याचे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.






