Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
August 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
       
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात जात असताना शाळेचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेत १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असे वंचित बहुजन आघाडीने सांगितले. 

या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून शाळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आतापर्यंत किती निधी उपलब्ध झाला आणि कोणत्या शाळांवर किती निधी खर्च करण्यात आला, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची एकूण संख्या, शिक्षक संख्या आणि विद्यार्थी पटसंख्या याबाबतचा अहवालही मागण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक इमारतींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच शाळांना देण्यात आलेल्या विविध सुविधांचा अहवाल सादर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनेकर यांच्या कथित उद्धट बोलण्यावरून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. त्यामुळे काही काळ जिल्हा परिषद परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, प्रशांत गोळेवार, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, युवक शहर सचिव नरेंद्र शिंदे, शहर महासचिव विनोद इंगळे, सुहास सावंत, शाहिद शेख, शरीफ शेख, अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश देशमुख, विजय गायकवाड, विजयानंद उघडे, श्रीनिवास संगेपान आदी पदाधिकारी उपस्थित होते. शाळांच्या सुरक्षेबाबत तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Tags: MaharashtraPoliticalschoolsolapurSolapur School Roof CollapseVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

Next Post

वाडी बु. येथे समता सैनिक दल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home