नांदेड: शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची संवाद बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या आजी-माजी व चालू पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश भोसिकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राज अटकोर, दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन तसेच जिल्हा कमिटीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





