Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आदिवासींच्या हक्काच्या निधी लूट प्रकरणी श्वेतपत्रिका काढा– राजेंद्र पातोडे

mosami kewat by mosami kewat
August 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे
       

मुंबई : जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासासाठीच्या आर्थिक तरतुदी आणि प्रत्यक्ष खर्चाचा मध्ये प्रचंड तफावत असून श्वेत पत्रिका काढून केंद्र आणि राज्य सरकारने ही माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. 

भारतीय राज्यघटनेतील तरतुदी नुसार आदिवासी साठी ९ टक्के बजेट अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२५-२६ मध्ये आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ₹२१,४९५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र एवढी मोठी तरतूद असतानाही आदिवासीबहुल भागांमध्ये रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी आणि रोजगाराच्या मूलभूत सुविधांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे मंजूर निधीपैकी किती निधी प्रत्यक्ष खर्च झाला, किती अखर्चित राहिला आणि किती निधी इतर योजनांकडे वळवला गेला, याचा सरकारने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी पातोडे यांनी केली.

आदिवासींच्या विकासासाठी राज्यघटनेत अनुच्छेद ४६, २७५, ३३०, ३३२, ३३५ यांसह विविध विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संरक्षण करणे आणि सामाजिक अन्याय व शोषणापासून त्यांचे रक्षण करणे ही राज्याची जबाबदारी आहे. वनहक्क कायदा, पेसा कायदा आणि इतर कायदेशीर संरक्षण असूनही प्रत्यक्षात आदिवासी समाजाला त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. घटनात्मक संरक्षण असताना आदिवासींच्या विकासाचा निधी उपलब्ध असताना तो आदिवासी पाडे आणि वस्ती मध्ये पोहचला नाही.त्याचा प्रत्यक्ष तरतूद आणि खर्च यामध्ये एवढी मोठी तफावत का? असा सवाल पातोडे यांनी केला.

सरकारच्या आर्थिक नियोजनातील त्रुटींचाही त्यांनी समाचार घेतला. २०२४-२५ मध्ये आदिवासी भागातील रस्ते व पुलांच्या कामांसाठीचा ६४ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च न झाल्याने लॅप्स झाल्याचे समोर आले होते. दुसरीकडे २०२६-२७ मध्ये अनुसूचित जमातींसाठी २१,७२३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे चालू वर्षातील निधीचा जिल्हानिहाय आणि योजनानिहाय विनियोग आराखडा तसेच मागील वर्षातील मंजूर, वितरित, खर्च झालेला आणि अखर्चित निधी याचा संपूर्ण तपशील सरकारने जाहीर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

आदिवासींच्या नावावर मोठमोठ्या तरतुदी दाखवायच्या आणि प्रत्यक्षात त्यांच्या पाड्यांपर्यंत विकास पोहोचायचा नाही, ही फसवणूक आता चालणार नाही. आदिवासी समाजाला केवळ अर्थसंकल्पातील आकडा नको, तर त्या निधीतून प्रत्यक्ष शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा, रोजगार आणि मूलभूत सुविधा हव्या आहेत,”असे पातोडे म्हणाले. आदिवासी समाजाने जंगल, निसर्ग आणि जैवविविधतेचे जतन केले असून त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा आणि जीवनपद्धतीचा सन्मान राखत विकासाचे धोरण आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासींच्या विकासाचा निधी हा सरकारची मेहरबानी नसून त्यांच्या हक्काचा निधी आहे. निधी व्यापगत होणे, खर्चात दिरंगाई होणे किंवा आदिवासींच्या नावावर इतरत्र निधी दाखवणे याचा सरकारने हिशेब दिला पाहिजे. आदिवासी समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही,” असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला.


       
Tags: MaharashtraMaharashtra governmentRajendra PatodeVanchit Bahujan AaghadiWould Tribal day
Previous Post

मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Next Post

शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home