औरंगाबाद : बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते रमेश संभाजी वाघमारे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम तालुकाध्यक्ष एस. पी. हिवराळे यांच्या प्रयत्नातून पार पडला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघमारे यांनी पक्षप्रवेश केला. प्रवेशानंतर जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
या कार्यक्रमाला औरंगाबाद पश्चिम तालुकाध्यक्ष एस. पी. हिवराळे, जिल्हा महासचिव अंजन साळवे, जिल्हा संघटक खुशालराव बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अंकुश जाधव, तालुका महासचिव संघपाल इंगोले, गणेश गाडेकर व अरविंद साठे, तालुका संघटक महेंद्र तायडे व अरुण रुपेकर, तालुका उपाध्यक्ष आण्णा जाधव व भीमरत्न कांबळे तसेच मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






