Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे

mosami kewat by mosami kewat
August 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे
       

मुंबई : राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘बीएमएस-सीसीएमपी’ नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टर संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे सामान्य जनता हवालदिल झाली असून, संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प होण्याची वाट न पाहता सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

राज्य शासनाच्या प्रस्तावानुसार बीएमएस पदवीधारकांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यक (अॅलोपॅथी) पद्धतीतील काही औषधे लिहिण्याची आणि मर्यादित स्वरूपात उपचार करण्याची नोंदणी देण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयाला डॉक्टर संघटनांचा तीव्र विरोध असून, अशा प्रकारे अपुरे प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींना आधुनिक वैद्यकीय उपचारांचा अधिकार देणे हे रुग्णांच्या जीविताशी खेळण्यासारखे असल्याचे त्यांचे मत आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांना साडेपाच वर्षांचे पदवी शिक्षण, त्यानंतर इंटर्नशिप, नोंदणी आणि अनेकदा पदव्युत्तर विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. अशा परिस्थितीत अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक वैद्यकीय उपचारांचा अधिकार देणे हे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून, रुग्णांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण करू शकते.

ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्यास त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये रिक्त पदे तातडीने भरणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, आवश्यक औषधे व आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि पात्र डॉक्टरांना ग्रामीण सेवेसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. वैद्यकीय शिक्षणातील मूलभूत निकष शिथिल करून किंवा समांतर व्यवस्था निर्माण करून हा प्रश्न सुटणार नाही.

वंचित बहुजन आघाडीचे मत स्पष्ट आहे की, प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. शासनाने डॉक्टर संघटनांशी तातडीने चर्चा करून त्यांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा आणि रुग्णहिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेऊ नये.

आज राज्यभरातील डॉक्टरांनी अत्यंत संयमाने आंदोलन करत आपली भूमिका मांडली आहे. शासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून हा वाद तत्काळ सोडवावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे.


       
Tags: MaharashtramumbaiMumbai rajendra patodereservationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!

Next Post

बहुजन समाज पार्टीचे रमेश संभाजी वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
बहुजन समाज पार्टीचे रमेश संभाजी वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

बहुजन समाज पार्टीचे रमेश संभाजी वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home